पुणे, दि. 22 डिसेंबर
२०२२ (चेकमेट टाईम्स): कोल्हापूर येथील एका सराफ
व्यावसायिकाला चांदीच्या दागिन्यांची ऑर्डर देऊन त्याच्याकडून चार लाख रुपयांचा
चांदीचा ऐवज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत इम्रान ऊर्फ मुन्ना महमंद शेख (४०, रा. विश्वभारती कॉलनी, सुतारमळा, शिंगणापूर रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली
आहे. हा प्रकार १९ डिसेंबरला शिवणे येथील साहिल रेसिडेन्सी येथे घडला. याबद्दल जगदीश चौधरी व त्यांच्या
मित्रांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा कोल्हापूर येथे चांदी विक्रीचा
व्यवसाय आहे. आरोपी यांनी फिर्यादी शेख यांना फोन करून २५ किलो चांदीचे पैंजण व
घुंगरूची आर्डर दिली. आरोपी तयार असलेल्या १४ किलो चांदी त्यापैकी सहा किलो वजनाचे पैंजण व
८ किलो वजनाचे घुंगरू, असे चार लाखांचे दागिने
घेऊन गेले.
परंतु, त्यांनी
व्यवहाराचे पैसे न देता शेख यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84