Type Here to Get Search Results !

उसने दिलेले पैसे परत देत नसल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): हातउसने दिलेली रक्कम मागितल्याचा राग आल्यामुळे महिलेसह तिघांनी एकाला मारहाण केली. या वारंवारहोत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे संबंधित व्यक्तीने त्यांच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आलम चॉंद शेख (वय ४९, रा. माळवाडी, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलम यांनी चव्हाण कुटूंबियाला हातउसने रक्कम दिली होती. काही दिवसांनंतर त्यांनी रक्कम मागण्यास सुरवात केली. त्याचा राग आल्यामुळे संबंधित कुटूंबियाने आलम यांना काही दिवसांपूर्वी जबर मारहाण केली होती. या कुटुंबाकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याने आलम याने कंटाळून झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

 

याप्रकरणी अनिकेत शाहू चव्हाण, काळुराम शाहू चव्हाण यांच्यासह एका महिलेविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वडगाव शेरी येथे घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे करीत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.