पुणे, दि. 23 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टतर्फे ब्रह्मकुमारी शिवानीदीदी
यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘जीवन
बदलविणाऱ्या दैनंदिन सवयी’ या विषयावर त्या बोलत होत्या.
मनाची शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असते. त्याद्वारे स्वतःबरोबर
इतरांच्या जीवनातदेखील आनंदाची पेरणी करता येते, असे
मत ब्रह्मकुमारी आध्यात्मिक चळवळीतील शिक्षिका
ब्रह्मकुमारी शिवानीदीदी यांनी व्यक्त केले.
पुढे शिवानीदीदी म्हणाल्या, “आपण अनेक चुकीच्या सवयींचे गुलाम असतो आणि या सवयींचे रूपांतर
व्यसनामध्ये कसे होते, ते आपल्या लक्षात येत नाही. एखाद्या
गोष्टीवरचे आपले अवलंबित्व म्हणजे व्यसन होय. भारतीय परंपरेतील व्रत वैकल्यांची
मदत घेऊन आपण अनेक प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहू शकतो. भारतीय संस्कृतीने
सांगितलेल्या दिनचर्येचा, भारतीय आहार आणि विहार यांचा अवलंब
केल्यास मनाची सकारात्मकता वाढण्यास निश्चितच हातभार लागतो.”
शिवानीदीदी यांनी दैनंदिन जीवनातील आकर्षणांपासून दूर कसे
राहावे, आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरून करिअर किंवा
अभ्यासात एकाग्रता कशी प्राप्त करावी, व्यसन आणि
अनारोग्याचा सामना कसा करावा, कौटुंबिक आणि सामाजिक
नातेसंबंध दृढ करण्यासाठी मनःशांती कशी मिळवावी अशा विविध समस्यांवर संवाद साधला.
प्रास्ताविकात ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे विश्वस्त
नंदकिशोर राठी यांनी ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या व्याख्यानाच्या वेळी बॅल्को मेडिकल
सेंटरच्या संचालक ज्योती अग्रवाल, सुनीता कराड, ललिता फोफीया, राहुल
राठी, मनाली देसाई, नंदकिशोर राठी,
प्रल्हाद तिपानिया, सरितादीदी, उषाबेन आदी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84