पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): दहावीतील विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त
केल्याच्या आरोपावरुन एका मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला गेला आहे.
आयुष गारळे असं या
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव हितेश
शर्मा असे आहे. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, तसेच दहावीच्या परीक्षेत हक्काचे २० गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेलाही बसू देणार नाही, अशी धमकी मुख्याध्यापक
देत होते असा हितेश शर्मा यांच्यावर आरोप आहे.
आयुष दिघी येथील
प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच
शाळेत १० डिसेंबरला आयुषला शाळेतून घरी आणण्यासाठी त्याची आई स्वत: गेली होती.
तेव्हा मुख्याध्यापक शर्मा यांनी आईला आवाज देऊन बोलावून घेतलं आणि वरील सर्व गोष्टींबाबत
सांगितल्या. त्यामुळे आयुषने याचा चांगलाच धसका घेतला होता.
यानंतर १३ डिसेंबर
रोजी घरातील सगळे बाहेर गेले असता तेव्हा आयुष घरी असल्याने आयुषने गळफास घेतली आणि आयुष्य संपवलं. पिंपरी-चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
त्याच्या मृत्यूला
मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याच आधारावर भोसरी
पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर २४ डिसेंबरला कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल
केला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप मुख्याध्यापक शर्मांना अटक केलेली नाही.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84