Type Here to Get Search Results !

पुण्यातील कॉल गर्ल संस्कृतीची जनक कल्याणी देशपांडेसह दोघांना सात वर्षांची सक्तमजुरी

 


पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): वेश्याव्यवसाय आणि संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात कल्याणी देशपांडेसह दोघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि आणि याबरोबरच प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी कोथरूडच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी गुन्हा दाखलकरण्यात आला  होता.

 

पिटा ॲक्ट आणि मोकाच्या गुन्ह्यात विशेष मोका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली गेली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोडे आणि कर्मचाऱ्यांनी तिला अटक केली होती.

 

शहरातील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये वेश्याव्यवसाय चालविण्याच्या आरोपाखाली कल्याणी देशपांडे आणि तिच्या साथीदाराला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक केली होती. कल्याणी देशपांडेच्या विरोधात शहरातील कोक्षरूडसह चतु:शृंगी, विश्रांतवाडी, हिंजवडीसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल होते.

 

तत्कालीन पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली फडके यांनी गुन्ह्याचा तपास करून मोकाचा प्रस्ताव सादर केला होता. तसेच, तिच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. ती सध्या येरवडा कारागृहात आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी युक्तिवादात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती.

 

सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून विशेष मोका न्यायालयाने कल्याणी देशपांडेसह दोघांना ही शिक्षा सुनावली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.