पुणे, दि. 21 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): दिल्ली विधानसभा आणि महापालिकेवर
एकहाती सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाचे (आप) आमदार, नगरसेवक
पुण्यातील कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प आणि उत्पन्न
वाढीसाठी मिळकतकर याचा अभ्यास करणार आहेत.
दिल्ली महापालिकेत दिल्लीतील सर्व ७
खासदार, १४ आमदार आणि सर्व
नगरसेवक यांच्या विविध समित्या स्थापन केल्या जातात. त्यापैकी एक समिती पुणे
शहराच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामध्ये आमदार, नगरसेवक आणि
अधिकारी असे १४ जणांचे शिष्टमंडळ आहे.
या १४ जणांचे शिष्टमंडळ बुधवारी (ता.२१
डिसेंबर २०२२) आणि गुरुवारी (ता. २२ डिसेंबर २०२२) शहरातील विविध ठिकाणी भेटी
देणार आहे. महापालिकेत त्यांची आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह बैठक होणार आहे.
त्यानंतर पुढील दोन दिवसात विविध प्रकल्पांची पाहणी करणार आहेत.
पुणे शहरातील कचरा फुरसुंगी व उरुळी
देवाची येथील कचरा डेपोवर उघड्यावर टाकणे बंद केले, त्यानंतर कचरा जिरविण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना
केल्या.
त्यामध्ये कचरा डेपो येथील लाखो टन
कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कॅपींग करणे,
तो परिसर दुर्गंधीमुक्त करणे, वृक्षारोपण करणे
अशी कामे केली. ओला कचरा जिरविण्यासाठी बायोगॅस प्रकल्प सुरू केले. सध्या शहरातील १३
प्रकल्प सुरू आहेत. त्याच प्रमाणे स्वच्छ संस्थेमार्फत घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे
मॉडल अशा विविध उपाययोजना केल्या आहेत. मिळकतकर विभागातर्फेही उत्पन्न वाढीसाठी केल्या
जाणार्या उपायांचेही सादरीकरण केले जाणार आहे.
दिल्ली विधानसभेत ‘आप’ची सत्ता आहे. पण
महापालिकेत ‘भाजप’ची सत्ता होती. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणूका झाल्या, त्यामध्ये ‘आप’ने महापालिकेवरही सत्ता
मिळवली आहे.
‘आप’चे प्रदेश संयोजक विजय कुंभार म्हणाले, ''आपचे आमदार, नगरसेवक
व अधिकारी दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. अशा प्रकारचे दौरे इतर शहरातही होणार
आहेत. पुणे दौऱ्यात महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात केलेल्या चांगल्या कामाची ते
माहिती घेतील, अभ्यास करून त्याबाबत दिल्लीत अंमलबजावणीचा
विचार करतील. या शिष्टमंडळासमोर आम्हीही आमचे मुद्दे मांडू.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84