पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
पिंपरी-चिंचवड
शहरातील नागरिकांच्या अनधिकृत नळजोडणीच्या तक्रारी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी विशेष मोहीम हाती
घेण्यात आली होती. 1 जानेवारी 2023 पासून अनधिकृत नळजोड तोडण्याची मोहीम हाती
घेण्यात येणार असून अनधिकृत नळजोड आढळल्यास अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हा
दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सह शहर अभियंता सवणे यांनी सांगितले.
“नियमात बसत
असलेल्या 15 मिली मीटर व्यासाच्या रहिवासी अनधिकृत नळजोडधारकांनी या अंतिम संधीचा
लाभ घेत नळजोड नियमित करून घ्यावे. यासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत विहित
नमुन्यातील अर्ज आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये दाखल करावे, तसेच याबाबत अधिक
माहितीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा.” असे
सह शहर अभियंता सवणे यांनी सांगितले.
या मोहिमेची
परिणामकारता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी
नळजोड नियमितीकरण मोहिमेस मुदत वाढ देण्यात आली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84