Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावरील नगरसेवकाने अभिनेत्री तेजस्विनी पंडितला केली होती “तसली” ऑफर

 

पुणे, दि. 22 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): अनेक मराठी चित्रपट आणि मालिका गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने पुण्यातील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहताना तिला आलेला अपमानास्पद अनुभव अलिकडेच सांगितला.

 

२००९-२०१० च्या आसपासची गोष्ट आहे. आम्ही पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायचो. त्यावेळी माझे एक-दोनच सिनेमे रिलीज झाले होते. अपार्टमेंट एका नगरसेवकाच्या मालकीचे होते. मी भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याने मला थेट ऑफर दिली, असं तेजस्विनी एका पोडकास्टवर म्हणाली.

 

टेबलावर पाण्याचा ग्लास होता, मी तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते. मी घरं आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या, असं नगरसेवकाला सुनावल्याचं तेजस्विनी म्हणाली.

 

स्ट्रगलिंगच्या काळात नाव कमवण्यासाठी धडपडत असताना पुण्यातील एका नगरसेवकाने आपल्याकडे घाणेरडी मागणी केली होती, असा दावा तेजस्विनीने केला. पत्रकार सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टवर मुलाखत देत असताना तेजस्विनीने नगरसेवकाचे नाव घेण्याचं टाळत त्याने केलेल्या निर्लज्ज ऑफरविषयी सांगितलं. तेजस्विनी सध्या तिच्या अथांग या नवीन वेब सिरीजचे प्रमोशन करत आहे.

 

या प्रकरणाबद्दल ती पुढे म्हणाली की, "माझ्या व्यवसायामुळे आणि माझी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत हे धाडस केलं. पण माझ्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता."

 

तेजस्विनी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या आहे. तेजस्विनीने २००४ मध्ये केदार शिंदेच्या 'अगं बाई अरेच्चा' या चित्रपटातून पदार्पण केले. मी सिंधुताई सपकाळ, तू हि रे, देवा, एकतारा यासारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. याशिवाय रानबाजार, समांतर या तिच्या वेबसीरिजही गाजल्या आहेत. एकाच या जन्मी जणू, लज्जा यासारख्या मालिकांतूनही तिने अभिनय केला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.