Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये ब्रेक फेल झालेल्या ॲसिड टँकरची कार’ला धडक; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

 

पुणे, दि.२३ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): कात्रज कडून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना वारजे नदी पुलावर पुढे चाललेल्या मोटारीला मागून आलेल्या ॲसिड टँकरने जोरात धडक दिल्याची घटना समोर आली आहे. सदरील ॲसिड टँकरचे ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. यावेळी अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या वारजे पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत, वाहनचालकांची संभाव्य वाहतूक कोंडीतून सुटका केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार दि.२३ डिसेंबर २०२२ सकाळी 8:30 वाजता, ॲसिड टँकर क्र. एमएच ०४ जीआर ३४४७ हा कात्रजकडून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना, वडगाव पुलावरून वारजे मुठा नदीच्या पुलावर उताराने आली असताना, त्याने पुढे चाललेली सँट्रो मोटार क्र. एमएच १२ ईएम ३२१७ ला मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने यावेळी सँट्रो मोटारीच्या जवळ कोणतीही वाहने नव्हती आणि ॲसिड टँकर देखील मोटारीला धडकून लगेच थांबला. अन्यथा टँकर मधील ॲसिड रस्त्यावर सांडण्यापासून अनेक वाहनांना धडक देण्यापर्यंत कोणतीही मोठी दुर्घटना घडली असती, सुदैवाने ती टळली.

याबाबत माहिती मिळताच, वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवलगी, पोलीस शिपाई अमोल सुतकर, रमेश चौधरी यांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत, अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन भर सकाळची वाहतूक सुरळीत केली, अन्यथा मोठ्या वाहतूक कोंडीला वारजे आणि सिंहगड रस्त्याला सामोरे जावे लागले असते.

याबाबत सँट्रो मोटार चालक प्रतिष गिरमे (वय.३५ रा.बेनकर वस्ती, धायरी, पुणे) यांच्या तक्रारीवरून ॲसिड टँकर चालक मोहित यादव (वय.३० रा.उत्तर प्रदेश) याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.