Type Here to Get Search Results !

मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या म्होरक्यासह दोघांना खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

 

पुणे, दि. 21 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): खुनाच्या प्रयत्नानंतर तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई झाल्यापासून फरार असलेल्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या.

 

सोन्या उर्फ राज रविंद्र भवार (22) आणि गौरव सुनिल कदम (22, दोघेही रा. धानोरी, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 16 डिसेंबर २०२२ रोजी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी रविंद्र फुलपगारे, प्रमोद सोनावणे व राजेंद्र लांडगे यांना गुन्ह्यात फरार असलेला म्होरक्या सोन्या भवार हा चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.

 

दरम्यान त्याचा साथीदार अकलूज येथे असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्याला अकलूज येथील हॉटेल सुभाष बिअरबार येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला पुढील तपासासाठी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

 

त्यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, मोक्का तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.