Type Here to Get Search Results !

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी राडा घातला; खुर्च्या मोडल्या, बॅरिकेटिंग तोडून स्टेजपर्यंत गेले

 

पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): आजकाल रोजच चर्चेत असणारी लावणी कलावंत गौतमी पाटील राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. अलिकडेच तिच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याच्या बातम्या समोर येत आहे. काल सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेमध्ये तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली होती. बसायला जागा नव्हती त्यामुळे तरुणांनी कार्यक्रमात राडाच घातला. तरुणांनी खुर्च्या मोडल्या अन् बॅरिकेटिंग तोडून स्टेजपर्यंत गेले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

 

सोलापूरमधील नातेपुते गावात गौतमीच्या कार्यक्रमाला अबाल वृद्धांसह तरुणांची प्रचंड गर्दी केली. गौतमीच्या डान्सवर, गाण्याच्या ओळींवर आणि तिच्या दिलखेच अदांवर नातेपुतेकर थिरकले. यावेळी कोणी फेटे उडवले, टोपी उडवली हे असं चित्र तिच्या कार्यक्रमात दिसून आलं. या कार्यक्रमात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. पण खुर्च्या कमी आणि गर्दी जास्त झाल्यामुळे बसायला जागाच उरली नसल्यामुळे तरुणांनी गौतमीचा डान्स सुरू असतानाच खुर्च्या फेकल्या आणि जागा मिळेल तिथे उभं राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

 

गर्दीला आवरण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग लावण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. दरम्यान, कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी लोकांना वेळीच सावरण्यास सुरुवात केली होती.

 

तिच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी झालेली दिसून येते. आपल्या दिलखेचक अदा आणि डान्समुळे तरुणाईसह इतर वयोवर्गातील लोक तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी दिसून येते.

 

काही दिवसांपूर्वी सांगली येथील बेडगमध्ये लोकांनी सरकारी शाळेचे कौलारू छत फोडले. झाडे पाडली. यामुळे गौतमीच्या एका कार्यक्रमादरम्यान एक मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली होती.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.