Type Here to Get Search Results !

चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाई फेकण्याची धमकी, कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

 


पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना शाईफेकण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले या फेसबुक अकाउंट धारकाने ही धमकी दिली आहे. याबाबत स्वप्नील बाबासाहेब बांगर (वय-33 रा. कोथरुड) यांनी शुक्रवारी (दि.16 डिसेंबर २०२२) कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलमध्ये फेसबुक पाहत असताना त्यांना चंद्रकांत पाटील यांच्यबाबत एक पोस्ट आढळून आली. ही पोस्ट राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले या फेसबुक अकाउंट धारकाने केली होती.

 

यामध्ये “चंपा च तोंड काळे केले रे, आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु.पो. सांगवी, पत्रकार मित्रांनो आज  पण चांगला अँगल घ्या” अशा आशयाची पोस्ट लिहिण्यात आली होती. संबंधित मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विकास लोले अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया चिंचवड विधानसभा या नावाच्या अकाऊंट धारकावर आयपीसी 117, 153 (अ)-1(ब),500, 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. दरम्यान आज या कार्यक्रमाला जाताना चंद्रकांत पाटील यांनी फेसमास्क वापरत काळजी घेतल्याचे देखील पाहायला मिळाले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.