Type Here to Get Search Results !

करदात्यांच्या हितासाठी प्रत्यक्ष कर व्यवस्थेतही ‘एक देश एक कर’ लागू करा

 


पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): आयसीएआयडायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने प्रत्यक्ष करया विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन चितळे यांच्या हस्ते झाले. कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या परिषदेत ५०० पेक्षा अधिक सनदी लेखापाल सहभागी झाले होते.

 

या प्रसंगी आयसीएआयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे उपाध्यक्ष यशवंत कासार, विभागीय समितीच्या सदस्य ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, सचिव प्रीतेश मुनोत, खजिनदार प्रणव आपटे, सदस्य सचिन मणियार आदी उपस्थित होते.

 

‘‘सामान्य करदात्यांच्या हितासाठी प्रत्यक्ष कर व्यवस्थेतही एक देश एक करलागू करावा. त्यातून करदात्यांना कर भरण्यात येणाऱ्या समस्या सुटतील. तसेच करदात्यांना भरलेल्या करातून निवृत्ती वेतन देण्याचे धोरण राबवावे,” असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले.

 

टॅक्सेशन ऑफ फ्युचर्स अँड ऑप्शन्सवर अभिषेक झावरे, ‘बांधकाम क्षेत्रातील करप्रणालीत येणाऱ्या अडचणींवर सीए जगदीश पंजाबी, ‘प्राप्तिकर अपिलीय प्राधिकरणाचे महत्त्वाचे निवाडेयावर नरेंद्र जोशी व अपूर्वा चांदक्कर, ‘रिट अधिकार व अलीकडील निवाडेयावर ॲड. कपिल गोयल, ‘टॅक्सेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्सवर सीए पारस सावला, ‘टॅक्सेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्स टू कंपनीज अँड कंपनी टू एलएलपीवर सीए विनिता कृष्णन यांनी मार्गदर्शन केले. समीर लड्डा यांनी सूत्रसंचालन, तर प्रीतेश मुनोत यांनी आभार मानले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.