Type Here to Get Search Results !

प्री लव्हरात्री; कंडोमच्या जाहिरातीत गरबा खेळणारे जोडपे दाखवल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत

 

पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): गुजराती संस्कृतीचा भाग असलेला गरबा नृत्य करणारं एक जोडपं कंडोमच्या जाहिरातीत दाखवल्याने वाद निर्माण झाला होता. जाहिरातीत लिहिलं होतं - प्री लव्हरात्री विकेंड ऑफर- ३ कंडोम असलेलं पॅकेट किंवा एक प्रेग्नन्सी कीट फ्री. या जाहिरातीत एक जोडपं गरबा खेळताना दाखवलं होतं.

 

मात्र हे दृश्य अयोग्य नाही, हे धार्मिक भावना दुखावणारं नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे. हा निर्णय त्याबद्दलच्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंग यांनी दिला. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने याविषयीचा निर्णय दिला आहे.

 

एका फार्मासिस्टने ही जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. अर्जदाराचं इंदूरमध्ये मेडिकलचं दुकान आहे. त्याच्याविरोधात या पोस्टशिवाय इतर कोणताही पुरावा नाही, त्याच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तो स्वतः हिंदू धर्मीय आहे, तसंच त्याने ही पोस्ट शेअर करताना स्वतःची ओळखही लपवली नव्हती. त्यामुळे त्याचा हेतू धार्मिक भावना दुखावण्याचा नसून केवळ आपलं प्रोडक्ट विकण्याचा होता. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचं कारण नाही, असं न्यायालयात सांगितला गेला.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.