पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): कोरोना
संसर्गाच्या काळात अगदी कडक लॉकडाऊन चालू असतानाही समाजाच्या गरजेसाठी अत्यावश्यक
सेवा चालू होत्या.
या कालावधीत
नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आरोग्य विभागाचे योगदान मोलाचे ठरले आहे. कोरोना
महामारीतही औषधोपचार करणे, कोरोना केंद्रात आरोग्य सेवा पुरविणे,
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कोरोना लसीकरण करणे आदी कामांमध्ये चतुर्थ श्रेणी कामगार, सुरक्षा रक्षक आदींनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
पुणे शहरात कोरोना
संसर्गाच्या काळात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुणे
महापालिकेच्या सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी
भारतीय मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी (ता. १६ डिसेंबर २०२२) कामगार
उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय ठेका मजदूर
महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे आणि आरोग्य मिशन संघांचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी
यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
या मागणीच्या
पूर्ततेसाठी येत्या बुधवारी (ता. २१ डिसेंबर २०२२) मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा
यावेळी करण्यात आली.
या कर्मचाऱ्यांना
नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी सरकारी आणि प्रशासन पातळीवर वारंवार पाठपुरावा
केला आहे. पण राज्य सरकारने याबाबत अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने ही
निदर्शने करण्यात येत असल्याचे मेंगाळे यांनी यावेळी सांगितले. या वेळी कोरोना
योद्धा कामगार प्रतिनिधी जयश्री रगडे, नुराणी शेख, उज्वला वाबळे, वर्षा मोरे, रोहित केंडे आदींसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84