Type Here to Get Search Results !

२४ तास पाणी पुरवठ्याचे काम एक महिन्यापासून बंद; मीटरच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): समान पाणी पुरवठा योजनेचे काम सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक असताना आता मीटरच उपलब्ध नसल्याने जवळपास एक महिन्यापासून हे काम ठप्प झाले आहे. पुणे शहरातील असमान पाणी पुरवठ्यामुळे काही भागात २४ तास पाणी तर काही भागात वर्षभर पाणी टंचाई असते.

 

पाण्याच्या मीटरमध्ये बसविल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक चीपचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुटवडा निर्माण झाला असल्याने महापालिकेला मीटर मिळण्यास उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिलेले असले तरी योजनेच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. शहराच्या सर्व भागात समान व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करता यावा यासाठी सुमारे २४५० कोटी रुपये खर्च करून या योजनेचे काम पूर्ण केले जाणार आहे.

 

सप्टेंबर २०२३ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत १२०० किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाणार असून, त्यापैकी आत्ता ८०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर अद्याप ४०० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम शिल्लक आहे. तर सोसायट्यांना ३ लाख १८ हजार मीटर बसविले जाणार असून, त्यापैकी आत्तापर्यंत १ लाख मीटर बसवून पूर्ण झाले आहेत.

 

केवळ ३० टक्के मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्याने हे उर्वरित नऊ महिन्यात तब्बल २ लाख १८ हजार मीटर बसविणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रशासनाने रोज किमान दीड ते दोन हजार मीटर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले होते. पण हे उद्दिष्ट गाठणे अवघड झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

महापालिकेने इलेक्ट्रो मॅग्नेटिकपाणी मीटर बसविण्यास सुरवात केली आहे. या मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप आहे. त्यामुळे मीटरचे रीडिंग घेण्यापासून तर ते मीटर सुस्थितीत आहे की नाही इथपर्यंत कळते. जगभरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, इ वाहने यासाठी मोठ्याप्रमाणात इलेक्ट्रॉनिक चीपची मागणी वाढलेली आहे. त्याचा फटका पाण्याचे मीटर तयार करणाऱ्या कंपनीलाही बसला आहे. या चीप उपलब्ध होत नसल्याने परदेशातून मीटर आलेले नाहीत. आमचा पाठपुरावा सुरू आहे. पुढली महिन्यात १० हजार मीटर उपलब्ध होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.

 

जगभरात इलेक्ट्रॉनिक चीपचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पाण्याचे मीटर तयार करणाऱ्या कंपनीकडेही चीप उपलब्ध नसल्याने महापालिकेला मीटरचा पुरवठा झालेला नाही. सुमारे एका महिन्यापासून शहरात नवीन मीटर बसलेले नाहीत. कंपनीकडून मीटर उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील महिन्यात १० हजार मीटर उपलब्ध होतील. पण ही संख्या अपुरी आहे.असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.