पुणे, दि. 23 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): वाणिज्य पदवीधर आणि प्रसिद्ध योग
प्रशिक्षक प्रीती भिडे यांच्या दोन 'ऑडिओ बुक्स' च्या प्रकाशनाचा शानदार सोहळा पार पडला.
सौ. भिडे यांना साहित्य व संगीत या दोन्ही क्षेत्रांची आवड आहे.
त्यांनी गेल्या काही
वर्षात अनेक कथा कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण आणि
पुरस्कारप्राप्त तसेच वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेल्या कथांपैकी निवडक कथा 'ऑडिओ बुक्स' स्वरूपात
नुकत्याच प्रकाशित झाल्या.
जीवनात आलेले निरनिराळे
अनुभव आणि प्रत्यक्ष ऐकण्यात, पाहण्यात आलेल्या हृदयस्पर्शी घटना यांना शब्दरूप देऊन
साकारलेला कथासंग्रह म्हणजे 'कथा निराळी' आणि मानवी मनाच्या अद्भुत कल्पना शक्तीचा आविष्कार आणि मनात उमटणारे तरंग याना शब्दरूप देऊन
साकारलेला कथा संग्रह म्हणजे 'भाव तरंग'! या दोन्ही ऑडिओ बुक्स चे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.
यातील कथा रंजना काळे, संजीवनी कर्वे, प्रियांका
गोगटे, जयश्री जोशी तसेच अधोक्षज बाम आणि गिरीश जोशी यांच्या
प्रभावी व सुमधूर वाणीतून सादर झाल्या आहेत. पार्श्वसंगीत अधोक्षज बाम यांचे असून
दिग्दर्शन गिरीश जोशी यांनी केले आहे.
हॉटेल 'क्लार्क्स इन' येथे
झालेल्या समारंभात प्रमुख पाहुण्या वीणा सहस्रबुद्धे (संचालक - योग् साधना ) आणि
शुभांगी जोशी (गीता धर्म मंडळ - वरिष्ठ मार्गदर्शक) यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा
संपन्न झाला. शरीराच्या सुदृढतेप्रमाणेच मनही सहृदय व सकारात्मक असणे गरजेचे आहे
असे विचार त्यावेळी व्यक्त करण्यात आले.
वरील सर्व कलाकार, कुटुंबीय, मित्र,
सुहृद तसेच साहित्य, संगीत, वाणिज्य व फायनान्स या क्षेत्रातील काही मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित
होते. पुण्यातील झंकार स्टुडिओ मार्फत, 'स्टोरी टेल' या गुगल ऍप वर हे दोन्ही कथासंग्रह आता चोखंदळ श्रोत्यांच्या पसंती साठी
उपलब्ध झाले आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84