Type Here to Get Search Results !

पुण्यातील पाणी टंचाईप्रश्नी ३ जानेवारी २०२३ पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची शेवटची संधी


 

पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईप्रश्नी राज्य सरकार, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीएमसी व पीसीएमसी), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे जिल्हा परिषद यांना १३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करीत आपले म्हणणे मांडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

 

मात्र, प्रतिवादी असलेल्या सर्व संस्था प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्या आहेत. मुख्य (प्रभारी) न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमुर्ती चपळगावकर यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र राज्य सरकार, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या दिरंगाईची गंभीर दखल घेतली असून त्यांना त्यांचे प्रतिज्ञापत्र ३ जानेवारी २०२३ पर्यंत दाखल करण्याची शेवटची संधी दिली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईप्रश्नी दाद मागण्यासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरी संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत यातील सरकारी आस्थापनांना दंडात्मक शिक्षेचा इशारा दिला. तसेच याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अंतिम संधी ३ जानेवारी २०२३ पर्यंत देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. सत्त्या मुळे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास उशीर करणे ही जाब देणाऱ्यांची एक प्रकारची विलंबाची युक्ती आहे.

 

यावरून त्यांना टंचाईच्या समस्येबाबत काहीच काळजी वाटत नाही, असे दिसून येते. न्यायालयाने पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीच्या स्थापनेबाबतचा अहवाल सादर करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

 

या समितीची स्थापना, अंमलबजावणी आणि प्रगती याबाबत कोणतीही माहिती कागदोपत्री दाखल करण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. मुदतीत प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही तर जाब देणाऱ्यांवर दंडात्मक शिक्षेची कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य (प्रभारी) न्यायमूर्तींनी दिला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.