Type Here to Get Search Results !

शिवसेना जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार; पुण्यातील घटना

 



पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): मागील काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं आहे. कालच पुण्यात टोळक्याने तलवार आणि चाकूच्या सहाय्याने दहशत निर्माण केली होती. तर काही दिवसांपूर्वी फुकट काजूकतलीसाठी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच आजची घटना अशी की शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे.

हातात पिस्तुल घेऊन यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे असे म्हणत दहशत निर्माण केली.


पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणाऱ्याने हातात पिस्तुल घेऊन पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून हवेत गोळीबार केला. अतिक शेख, सादिक शेख आणि हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबर 2022 या दिवशी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर साथी दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं. २२ मधील कार्यालयात आले़. कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत निर्माण केली.

पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले तपास करत आहेत.


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.