पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत घेण्यासाठी अद्याप अर्ज
न केलेल्या ठेवीदार, खातेदार यांनी संबंधित शाखेशी त्वरित
संपर्क करावा. ठेवीदारांनी आवश्यक पूर्तता करुन योग्य कागदपत्रांसह बँकेच्या
कोणत्याही शाखेत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत. अन्यथा रुपी बँक
जबाबदार राहणार नाही, असे आवाहन रुपी बँकेतर्फे करण्यात आले
आहे.
रुपी बँक गेल्या १
नोव्हेंबरपासून अवसायनात आली असून, धनंजय डोईफोडे यांनी अवसायक पदाचा
पदभार स्वीकारला आहे. अवसायनाच्या प्रक्रियेनुसार ठेव विमा महामंडळातर्फे ज्या
ठेवीदारांना यापूर्वी बँकेकडून पाच लाखांपर्यंतची विमा संरक्षित ठेव रक्कम
मिळालेली नाही, अशा ठेवीदारांना अर्ज देण्याबाबत यापूर्वी
आवाहन करण्यात आले होते.
रुपी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज
करावेत. या मुदतीत अर्ज सादर न केल्यामुळे ठेवींची रक्कम मिळण्यास अडचणी निर्माण
झाल्यास रुपी बँक जबाबदार राहणार नाही, अशी माहिती अवसायक
धनंजय डोईफोडे यांनी दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84