पुणे, दि.१६ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या स्थापनेपासून किंबहुना त्याच्या अगोदर वारजे माळवाडी परिसर जेव्हा कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत किंवा अगदी डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत होता, तेव्हा देखील जी अथवा ज्या प्रकारची घटना घडली नव्हती. तशी कृती करण्यापेक्षा तसा विचार करण्याचेही कोणाचे धाडस देखील झाले नव्हते. त्या प्रकारची घटना वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर एवढी मोठी घटना घडायला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
ती घटना देखील आहेच एवढी अचंबित करणारी, झालंय असं की, गुरुवार दि. १५ डिसेंबर २०२२ रोजी वारजे गणपती माथा भागात जुन्या जकातनाक्याच्या सरकारी जागेत असलेली रॉयल पान शॉप ही पानटपरी मध्यरात्री १ वाजला तरी सुरु होती. टपरी समोर तरुणांची गर्दी दिसत होती. यावेळी गस्तीवर असलेल्या वारजे पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांच्या ही बाब निदर्शनास येताच, त्यांनी तत्काळ त्या तरुणांना हाकलून लावून टपरी बंद करण्यासाठी फर्मावले.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके हे गाडीतून उतरून रॉयल पान शॉपच्या दिशेने जात असताना, रॉयल पान शॉप समोरील गर्दीमधून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करत तरुणांचे टोळके रॉयल पान शॉप शेजारील गल्लीतून डोंगराच्या दिशेने पसार झाले. मात्र यावेळी ते त्यांची मारुती झेन मोटार सोडून पळून गेले होते. सदरील मोटार वारजे पोलिसांनी जप्त करत १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस नाईक गोविंद फड यांनी तक्रार दिली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवलगी पुढील तपास करत आहेत.
यावेळी घडलेल्या घटनेचे गांभीर्य पाहता, तत्काळ तपासाची सूत्रे फिरवत वारजे पोलिसांच्या पथकाने शिताफीने दिग्विजय काकाराम वाघमारे (वय 19, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे), व्यंकटेश प्रमोद पिळवणकर (वय 19, रा. आंबेगाव बुद्रुक) आणि अमोल निलेश पवार (रा.कर्वेनगर, पुणे) या तिघांसह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले, त्यांचे साथीदार आप्पा लोंढे (रा.धायरी, सिंहगड रोड, पुणे) आणि खंड्या वाघमारे (रा.रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) यांच्यासह आणखी तीन ते चार जण फरार आहेत. यातील दिग्विजय वाघमारे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
एकूणच चार जणांना ताब्यात जरी घेण्यात आले असले तरी एवढी गंभीर घटना वारजे माळवाडी परिसरात घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातच अपवादात्मक परिस्थितीत काही वाईन शॉप आणि बिअर बार वगळता सर्व बाजारपेठ जास्तीत जास्त ११ वाजेपर्यंत बंद होते, असे असताना देखील ते रॉयल पान शॉप एवढ्या मध्यरात्री पर्यंत कसे चालू होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचे काय? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
पोलिसांचा खाक्या हा शब्द ऐकून बरेच दिवस झाले आहेत,खाकीतील पोलीस सुरक्षित नसतील तर जाहीरपणे पोलिसांनी पोलिसी खाक्या वापरून सदरक्षणाय* खल निग्रहनाय * ब्रीद प्रमाणे समाजाला जाणवेल अश्या पध्दतीने जोरात काम करायला हवे असे वाटते- कामगार भूषण राजेंद्र वाघ
उत्तर द्याहटवा