Type Here to Get Search Results !

पुण्यात आसारामजी बापूंच्या अनुयायांकडून भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा; तुळशी रोपांचे वाटप, तुलसी पुजनाचे संदेश

 


पुणे, दि.1९ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): तुलसी पूजन दिवसाच्या प्रसारासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून रविवार, दि १८ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात 'भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा' काढण्यात आली. २५ डिसेंबर हा 'तुलसी पूजन दिवस' म्हणून आसाराम बापूंच्या अनुयायांकडून २०१४ पासून  साजरा केला जातो. याही वर्षी मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रसार व्हावा यासाठी पुण्यात आज सायंकाळी ६ वाजल्यापासून सारसबाग ते संभाजीबाग या मार्गावर भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा काढण्यात  आली. 

सफेद वस्त्रे आणि भगवी टोपी, उपरणी परिधान करून भक्तगण सहभागी झाले. तुलसीपूजनाचे, तुलसी महात्म्य सांगणारे फलक त्यांनी हाती घेतले होते. आसाराम बापूंच्या छायाचित्रांचे रथही सामील झाले होते. 'यतो धर्म,स्ततः जय','अपनी संस्कृती, अपनी विरासत','आदते बदलो, विचार बदलो' असे संदेश देणारे फलक अनुयायांनी हाती घेतले होते.

यात्रेदरम्यान तुळशीच्या रोपांचे आणि तुलसी पूजन दिवसाचे संदेश असलेली पत्रके वाटण्यात  आली. संभाजीबागेत यात्रा समाप्तीनंतर आरती करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आले. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात.त्याला पर्याय म्हणून मानवकल्याणासाठी,स्वास्थासाठी,पर्यावरण रक्षणासाठी तुलसी पूजन उपक्रम आयोजित केला जातो. या कालावधीत  तुलसी पूजन, जप माळ पठण, गोपूजन, हवन, गौ-गीता-गंगा जागृती, सत्संग आदी उपक्रम आयोजित केले जावेत, असा अनुयायांचा प्रयत्न आहे, अशी माहिती  देण्यात आली.

प्रकाश कनोज, दीपक भाई, गणेश सुर्वे, सत्येंद्र भाई, नीलेश परदेशी, सुमीत भाई, सौ. नागोशे, ललीता ताई, जितेंद्र नंदनवार यांच्यासह २ हजार पेक्षा अधिक अनुयायी या यात्रेत सहभागी झाले होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.