Type Here to Get Search Results !

उजनी धरणातील पळसदेव भागात हिमालयातील ग्रिफनचा विहार; पहिल्यांदाच हा पक्षी आला उजनी भागात

 



पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखली जाणारी हिमालयातील ग्रिफन प्रजातीची गिधाडे स्थलांतर करून उजनी धरणावर दाखल झाली आहेत.

जिप्स फल्विस (Gyps fulvis) अशा शास्त्रीय नावाने आणि पांढरे व मोठे गिधाड तसेच मराठीतील ग्रिफन गिधाड नावाने परिचित असलेल्या या गिधाडांनी मागच्या आठवड्यात उजनी पाणलोटक्षेत्रात जोडीने विहार करताना स्थानिक पक्षिनिरीक्षकांना प्रथमच दर्शन दिले आहे.

 

ग्रिफन गिधाड याच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर हे सर्वांत मोठ्या आकाराचे असून, तपकिरी रंगाची पिसे असलेल्या या गिधाडाच्या मानेवर पिसे नसतात. डोक्यावर पिवळट पांढरी केसांसारखी बारीक पिसे असतात. पोटाखालचा भाग गुलाबी व उदी रंगाचा असतो व त्यावर पिवळसर पट्टे असतात.

 

पाकिस्तान, नेपाळ, उत्तर भारतातील पहाडी परिसर व हिमालय पर्वतरांगेत वास्तव्याला असणारी ही गिधाडे हिवाळी पाहुणे म्हणून भारताच्या दख्खन भागातील महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांत तीन ते चार महिने वास्तव्याला येतात. यातील नर व मादी दिसायला सारखेच असतात. स्थानिक पक्ष्यांबरोबर स्थलांतरित पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या उजनी परिसरात विहार करणार्‍या पक्ष्यांच्या वैभवात या गिधाडांमुळे भर पडली आहे.

 

“एकेकाळी गावोगावी बहुसंख्येने नजरेस पडणार्‍या गिधाडांची संख्या मानवी अतिक्रमणामुळे प्रचंड वेगाने कमी झाली आहेत. नव्वदच्या दशकात जिल्ह्यातून गायब झालेली गिधाडे अधूनमधून आपले अस्तित्व दाखवत आहेत. गिधाडांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे.” असे ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले.

 

नैसर्गिक अन्नसाखळीत गिधाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. मात्र यातील बर्‍याच प्रजातींची संख्या मागील काही दशकांत अचानकपणे कमी झाल्याची बाब गंभीर आहे. दोन वर्षांपूर्वी उजनी परिसरात युरोशियन गिधाडांनी आपले अस्तित्व दाखविले होते. त्यानंतर ग्रिफन गिधाडे या ठिकाणी आल्यामुळे उजनी पक्षिवैभवात भर पडली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.