पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): नाणेकरवाडी
(ता. खेड) गावच्या हद्दीत आय.ए.आय कंपनीसमोर मोटारीची सोमवारी (ता.१९ डिसेंबर २०२२)
मध्यरात्री अडीचच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास धडक दिली. या जखमी
झालेल्या बिबट्याची माहिती वाहनचालकाकडून पोलिसांना देण्यात आली.
यानंतर आज (ता. २०
डिसेंबर २०२२) सकाळी चाकण वनविभाग, रेस्क्यू टीम, नेचर गार्ड
ऑर्गनायझेशन, फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचे सदस्यांनी
बिबट्याला जेरबंद केले.
दरम्यान, बिबट्याने नंदा खडका
(वय -२४) या महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले. तिच्यावर चाकण येथील युनिकेअर
हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे डॉ. अमोल बेनके यांनी
सांगितले.
दोन वर्षे वयाच्या
बिबट्याला पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्र जुन्नर येथे नेण्यात आले, अशी माहिती चाकण
वनपरिक्षेत्राचे अधिकारी योगेश महाजन यांनी दिली.
बिबट्या पुणे-नाशिक
महामार्गांवर मेदनकरवाडी बंगला वस्ती फाट्यावर खोल्यांमध्ये अरुंद बोळात लपून
बसल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी जुन्नरचे उपवन संरक्षक
अमोल सातपुते यांना बोलवले. त्यानंतर माणिकडोहचे बिबट्या निवारण केंद्राचे महेंद्र
ढोरे, डॉ.
चंदर तसेच रेस्क्यू टीम, नेचर गार्ड ऑर्गनायझेशन, फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचे सदस्य घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र
अधिकारी महाजन, अतुल सवाखंडे, बापूसाहेब
सोनवणे, शांताराम गाडे आदींनी एका तासात बिबट्याला पकडले.
बिबट्याला
पकडण्यासाठी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सागर बामणे, वनपरिक्षेत्र कर्मचारी योगिता नायकवाडी, एन. एम.
आरुडे, संतोष आगरकर, सचिन जाधवर,
वनरक्षक तसेच अग्निशमन दल व पोलीस कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84