पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): ‘संभाजी ब्रिगेड’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त
बुधवारी आयोजित अधिवेशनाचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. भरत जाधव यांना या
वेळी ‘विश्वभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
करण्यात आला. अभिनेता अशोक समर्थ यांनाही सन्मान करण्यात आला.
“मराठा आरक्षणाची
मागणी रास्त आहे. आरक्षण मिळण्यासाठी वकिलांची टीम आहे. समन्यवक आणि पदाधिकारी
आरक्षणासाठी काम करीत आहेत. आरक्षण मिळेल, तेव्हा त्याचा फायदा अवश्य घ्या; पण आरक्षण मिळण्यासाठी वेळ लागणार असेल, तर पुढे काय?
याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरक्षणाचा जप करत
बसण्यात अर्थ नाही.” असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी व्यक्त केले.
चव्हाण म्हणाले,”आरक्षणाचा जप
करण्यापेक्षा तरुणांनी शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करावा. तरुणांनी अर्थकारण करून
हाताला रोजगार द्यावा. शेतकरी असाल, तर शेतीत अत्याधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करावा. शिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करा. मात्र, हे सगळे करताना व्यक्तिमत्त्व विकास करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. आधुनिक
तंत्रज्ञानामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी किती राहतील, याबाबत
शंका आहे. यामुळे भविष्याचा विचार करता अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करणारे
उद्योजक होणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे खूप बदल होत आहेत. त्यामुळे
पूर्वीप्रमाणे विचार करून होणार नाही. तंत्रज्ञानाच्या काळात टिकण्यासाठी तरुणांना
आयुष्यभर विद्यार्थी होऊन राहावे लागणार आहे. आंतराष्ट्रीय शिक्षणाचा विचार करता
देशातील शिक्षणाचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे हे शिक्षण जागतिक पातळीवर किती
उपयोगी पडेल, ही शंका आहे. जगातील दोनशे विद्यापीठांत आपल्या
विद्यापीठांचा क्रमांक नाही. विद्यापीठ ज्ञान देणारे केंद्र असले पाहिजे; परंतु सध्या विद्यापीठ पदवी देणारे केंद्र झाले आहे. भविष्याचा विचार करात
ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे; तसेच
अर्थव्यवस्थेसाठी दरडोई उत्पन्न वाढणे आवश्यक आहे.”
“हल्ली पुस्तक
वाचण्याची भीती वाटते; कारण प्रत्येक पुस्तकांमध्ये वेगवेगळे संदर्भ दिले जातात. त्यामुळे
पुस्तकात लिहिले आहे, तोच खरा इतिहास आहे, असे वाटते. त्यामुळे तरुणांनी वर्तमान वाचायला हवा. भारत तरुणांचा देश आहे;
परंतु भारत हा विचारी आणि निरोगी तरुणांचा देश होणे आवश्यक आहे.”
असे अभिनेता अशोक समर्थ यांनी सांगितले.
यांच्या सोबतच कार्यक्रमात
खासदार श्रीनिवास पाटील, अभिनेता भरत जाधव, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले,
भूषणसिंह राजे होळकर, ‘संभाजी ब्रिगेड’चे प्रदेशध्यक्ष प्रवीण गायकवाड, लेखक अरविंद जगताप
या वेळी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84