Type Here to Get Search Results !

युवक क्रांती दलाच्या कार्यवाह पदी जांबुवंत मनोहर

 

पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): युवक क्रांती दलाच्या कार्यवाह पदावर जांबुवंत मनोहर यांची निवड झाली आहे. जांबुवंत मनोहर हे युवक क्रांती दलाचा लढाऊ चेहरा मानले जातात. ही नियुक्ती ३ वर्षांसाठी आहे. “संघटना वाढविण्यासाठी महाराष्ट्र भर दौरा काढणार असून युवती आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, आंतरजातीय -आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण, शेतकरी, विद्यार्थी आणि दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहेत.” अशी माहिती या निवडीनंतर बोलताना जांबुवंत मनोहर यांनी दिली.

 

युवक क्रांती दलाची राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. या बैठकीत राज्य कार्यवाहपदी जांबुवंत मनोहर यांची एकमताने निवड झाली. युक्रांदचे जेष्ठ नेते अन्वर राजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी, सदस्य निवडण्यात आले. युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते गांधी भवन येथे नियुक्ती पत्रे देऊन अभिनंदन करण्यात आले.

 

या दलाच्या राज्य उपाध्यक्षपदी संदीप बर्वे, राज्यसंघटक पदी अप्पा अनारसे, सहकार्यवाह पदी राजकुमार डोंबे व डॉ. रश्मी सोवनी, मराठवाडा संघटक शाम तोडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी युवक क्रांती दलाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुदाम लगड, नीलम पंडीत, सुदर्शन चखाले, प्रसन्न मराठे, विवेक काशीकर, रोहन गायकवाड, मयुर शिंदे,आदित्य आरेकर, दीपक मोहिते, आबेद सय्यद उपस्थित होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.