Type Here to Get Search Results !

डांबराच्या गोळ्यांखाली दारूच्या साठ्याची तस्करी करणारा ट्रक नवले पुलाजवळ पकडला; पावणे दोन कोटींची दारू जप्त

 

पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): नवीन वर्षाच्या स्वागताला १ दिवस उरला आहे. मात्र त्याआधीच पुण्यात कोट्यवधी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

या दोन्ही ट्रकमधूनही दारू पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात असताना ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यातील आरोपींनी पोलिसांना संशय येऊ नये यासाठी या दोन्ही ट्रकमध्ये डांबराच्या गोळ्या पसरून ठेवल्या होत्या. जेणेकरून मद्य साठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लिक झाली तरी वास येणार नाही.

 

त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे. या कारवाईत २ ट्रक आणि त्यात तब्बल २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. ऐन "थर्टी फर्स्ट" सेलिब्रेशनच्या तोंडावर असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील ७ आरोपींपैकी काही जणांवर याआधी देखील अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.