पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): शहरामध्ये 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे एकूण 442 संशयित रुग्ण आढळले आहेत. महापालिकेतर्फे गोवर प्रभावित भागामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
कुदळवाडी येथे सुरुवातीला 29 नोव्हेंबरला 5 जणांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर थेरगाव परिसरातदेखील गोवरचे 2 रुग्ण आढळले. सध्या शहरातील विविध भागांमध्येदेखील गोवरचे रुग्ण आढळले आहेत.
गोवरबाधित रुग्णांची संख्या 26 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरात नव्याने आढळलेल्या 22 गोवरबाधित बालकांचा समावेश आहे. तर, 4 बालकांना गेल्या वर्षभरात लागण झालेली आहे.
आत्तापर्यंत 3 लाख 10 हजार 469 घरांमध्ये सर्वेक्षण केले आहे. जवळपास 10 लाख 88 हजार 25 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या वतीने 5 वर्षाखालील 67 हजार 924 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत एकूण 3 हजार 598 बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, 32 हजार 847 बालकांना व्हिटॅमिन ‘ए’ची मात्रा देण्यात आली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84