Type Here to Get Search Results !

पुणे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात स्वेटरचे पैसे जमा; लवकर स्वेटर घेण्याचे आवाहन

 


पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):  कोरोनाच्या काळात दोन वर्ष शैक्षणिक साहित्याचे पैसे दिले जात नसतानाही केवळ नियमावर बोट ठेवून महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वेटरपासून वंचित ठेवले होते.

 

पुणे महापालिकेच्या शाळेत गरीब घरातील विद्यार्थी शिकतात. त्यांना शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. यामध्ये वह्या, पुस्तक, गणवेश, बूट, स्वेटर, दप्तर यासह इतर वस्तूंसाठी निश्‍चीत केलेली रक्कम थेट विद्यार्थी किंवा पालकांच्या थेट बँक खात्यात (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर -डीबीटी) रक्कम जमा केली जाते. कोरोनामुळे दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा निधी डीबीटी करण्यात आलेला नव्हता.

 

हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने तातडीने ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर दोन आठवड्यात शिक्षण विभागाने इयत्ता दुसरी, चौथी, सहावी आणि आठवीच्या ३२ हजार विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात स्वेटरचे पैसे जमा केले आहेत. आता पालकांनी मुलांना लवकर स्वेटर घेऊन द्यावेत यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे.

 

यंदा शाळा सुरू झाल्याने प्रशासनाने पैसे वर्ग करण्यास सुरवात केली. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत ८९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या इयत्तेनुसार १५०० रुपयांपासून ते ४५०० रुपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यात जमा केली. महापालिकेच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना एक वर्षा आड स्वेटरचे पैसे दिले जातात. कोरोनात दोन वर्ष पैसे दिले नाहीत हे लक्षात न घेता केवळ ५० टक्के म्हणजे १ ली, ३ री, ५ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांना स्वेटरसाठी २६० ते २८० रुपये जमा केले. पण इयत्ता २ री, ४ थी, ६ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भर थंडीत स्वेटर शिवाय शाळा गाठावी लागत होती.

 

“इयत्ता दुसरी, चौथी, सहावी आणि आठवीच्या ३२ हजार विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात स्वेटरचे पैसे जमा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना स्वेटर घेऊन द्यावे व त्याची पावती शाळेत जमा करावी अशा सूचनाही दिल्या आहेत. पुढील आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांनी स्वेटर घेणे अपेक्षीत आहे.”, असे शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.