Type Here to Get Search Results !

वारजे जकात नाक्यावर झालेल्या तीव्र विरोधानंतर पालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने काढला पळ

 

पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. 6 आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पौडफाटा ते वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला धडक कारवाई करण्यात आली. यावेळी वारजे जकात नाक्यावरील कारवाई करत असताना झालेल्या तीव्र विरोधानंतर पुणे महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण विभागाला अक्षरशः पळ काढावा लागला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हा पहा व्हिडिओ:- https://twitter.com/checkmate_times/status/1608438523719475202


या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावरील तसेच फुटपाथ वरील साईड व फ्रन्ट मार्जींन मध्ये रस्ता पदपाथवर आलेले पत्र्याचे शेड, दुकानांचे फलक टपऱ्या, दुकाने, व्यवसायीक शेड हटवीत अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये तब्बल २१ हजार ५५० चौरसफूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. कारवाई दरम्यान वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कारवाई सुरू असताना पुणे महानगरपालिकेने नोटीस न देता कारवाई केल्याने कारवाईस मोठ्या प्रमाणात विरोध झाला. या ठिकाणी यापूर्वी दोनदा कारवाई करण्यात आलेल्या आहेत. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याचे दिसते. तर सदरील जागेच्या मालकीचा किंवा मोबदल्याचा काहीतरी वाद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

बुधवार दि.२८ डिसेंबर २०२२ च्या दुपारी पौड फाट्यावरून सुरु करण्यात आलेली ही कारवाई, पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ चे अधिक्षक अभियंता सुधिर कदम, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त राजेश गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता उदय कोदे, कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, गजानन सारणे तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्या पथकाने १ जेसीबी, ३ ट्रक, १० कर्मचारी, ३ पोलीसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.