पुणे, दि. 23 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): ठेकेदारांच्या हितासाठी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेचे कारण देत काढून टाकणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विरोध केला. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
केंद्र शासनाने निवृत्तीचे वय ६० व ५८ वर्ष निश्चित केलेले असताना पुणे महानगरपालिका प्रशासन केवळ ठेकेदारांच्या हितासाठी मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना अचानकपणे या वयात कामावरून काढून टाकत त्यांच्यावर उपासमारीचे संकट पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनामुळे येणार आहे.
पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ४५ वर्ष वय झाल्याचे कारण देत कामावरून कमी करणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात रोजगार तर मिळाले नाहीत परंतु आहेत ते रोजगार कसे जातील याकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे.
तसेच येत्या काही दिवसात स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील अशाच प्रकारे कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांमुळे या शहराची संपूर्ण घडी व्यवस्थितपणे चालते त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत बेरोजगार करण्याचे पाप पुणे महानगरपालिका प्रशासन करत आहे.
या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दांमध्ये निषेध करते तसेच सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा कामावर हजर करून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन या मोर्चाच्या वेळी यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना देण्यात आले.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नंदा लोणकर, प्रदीप देशमुख, प्रदीप गायकवाड, अशोक कांबळे, वनराज आंदेकर, नितीन कदम, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84