Type Here to Get Search Results !

‘सामाजिक न्याय’मधील पुस्तक भ्रष्टाचार ; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी पुस्तक खरेदी प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. आज नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत चौकशी करण्याची मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह केली.

 

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चे नंतर सुनील माने यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या विभागातील सचिवांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज विकास या योजनेत सुधारणा करून २०१८ पासून प्रत्येक जिल्ह्यास ०१ कोटी याप्रमाणे ३६ कोटी रुपयांची पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. शासनाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या या २१० पुस्तकांच्या यादीतील अनेक पुस्तकांचा अनुसूचित जाती नवबौद्ध वस्तीतील लोकांना सध्या उपयोग होत नाही. त्याचबरोबर या पुस्तकांची किंमत ही अवाजवी आहे.”

 

समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी ५ जुलै २०२२ रोजी आदेश काढून मेसर्स शब्दालय पब्लिकेशन अहमदनगर कडून २१० पुस्तकांचा संच ९९७५०/ - रुपयात खरेदी करून पुरवठा करण्याचे निर्देश दिलेत. यामध्ये अनेक पुस्तकांच्या किमती वाढवून लावण्यात आल्या आहेत. उदा, ‘आता होऊन जाऊ द्या’ या लोकनाथ यशवंत यांच्या कविता संग्रहाची मूळ किंमत १०० रुपये आहे. मात्र शासनाच्या यादीमध्ये या पुस्तकाची खरेदी किंमत ६८४ रुपये आहे. त्याचप्रमाणे ‘आणि शेवटी काय झाले ?’ या पुस्तकाची मूळ किंमत ८० रुपये आहे. मात्र समाज कल्याण विभाग हे पुस्तक ३१२ रुपयांना खरेदी करत आहे. म्हणजेच मूळ किमतीपेक्षा जवळपास ६ पट अधिक दराने समाजकल्याण ही पुस्तके खरेदी करत आहे. एवढी तफावत कशी काय असू शकते?

 

या उदाहरणातून पुरवठादाराच्या हितासाठी ही योजना राबवत असल्याचे संशय निर्माण होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेली ही योजना प्रामाणिकपणे राबवणे आवश्यक आहे. याबाबत चौकशी करून अशाप्रकारे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

 

सुनील माने यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर त्याबाबत प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळे या पुस्तक खरेदीला तात्पुरती स्थिगिती दिल्याचा आव खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणला आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांच्या मागणीवरून या प्रकरणी विभागाच्या सचिवांना चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.