Type Here to Get Search Results !

कोथरूडमधील बांधकाम व्यावसायिकाच्या हितासाठी बांधण्यात येणारी ‘ती’ भिंत काढून टाकण्याचा आदेश


 

पुणे, दि. 22 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): स्वप्नशिल्प सोसायटीच्या सीमाभिंतीलगत सुशोभीकरणासाठी पदपथावर एका खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या मदतीने महापालिकेचे अधिकारी भिंत उभारत होते आणि त्या भिंतीवर बांधकाम व्यावसायिकाचीही जाहिरात होणार होती.

 

सोसायटीतील रहिवाशांनी त्यावर आक्षेप घेतला असून रात्री बांधकाम थांबविण्याचीही विनंती केली होती. दरम्यान, सोसायटीच्या विरोधामुळे ते बांधकाम काही काळ थांबले. परंतु, पदपथावर उभारण्यात आलेली भिंत महापालिकेने काढली नाही.

 

त्यामुळे सोमवारी सोसायटीचे सचिव प्रशांत भोलागीर शिष्टमंडळ विक्रम कुमार यांना महापालिकेत भेटले. त्यावेळेस जी- २० परिषदेच्या निमित्ताने शहरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामात पदपथावर जाहिरातींसाठी भिंती बांधण्याचा आदेश कोठेही दिलेला नाही, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिले.

 

तसेच बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता अधिकारी सुधीर कदम यांना दूरध्वनी करून पदपथावर उभारण्यात आलेली भिंत काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.