Type Here to Get Search Results !

भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

 


पुणे, दि. 22 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं गंभीर आजारानं गुरुवारी (आज) निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत माळवली.

 

पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

 

कसबा मतदार संघाच्या आमदार व माजी महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक यांचे आज दु.३.३० वा दुखःद निधन झाले. उद्या सकाळी अंत्यदर्शनसाठी ९.०० ते ११.०० केसरी वाडा राहत्याघरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशाभुमी येथे ११.०० नंतर करण्यात येतील.

 

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात शहरासाठी महापौरपद भूषवलं होतं.

 

मुक्ता टिळक यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए (MA) केलं पुढे त्या एमबीए देखील झाल्या.

 

सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. ही त्यांची राजकारण क्षेत्रातली सुरुवात होती. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहता भाजपनं त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.