पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): नागरिकांनी टेकडीफोड भागात एकत्र येऊन बाणेर-
पाषाण टेकडीफोड विरोधात निषेध व्यक्त केला.
बाणेर - पाषाण
टेकडीफोड विरोधात अनेक वर्षापासून विरोध होत असतांनाही तसेच अनेक वेळेस बाणेर, पाषाण टेकडी बचाव
नागरिक कृती समितीतर्फे निवेदने देऊनही आणि टेकडी फोडण्याचा विरोध होत असतांनाही
हा प्रकार थांबवला गेला नाही.
या पुर्वी मनपाने
टेकडी फोडणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन या वेळी न पाळता राजेरोसपणे
टेकडी फोड प्रकरण सुरू आहे. बाणेर, पाषाण टेकडी स्मार्ट सिटी
व्दारे २०१९ ला व्हेनेझिया सोसायटी हायवे ते पॅन कार्ड क्लब बाणेर विभागात अंदाजे
३० ते ४० फूट उंच आणि १० मीटर लांब फोडली होती. त्या वेळेस नागरिकांनी तसेच वृक्ष
प्रेमीनी या जागेवर ऐकत्र येऊन विरोध दर्शविला होता. २० जुलै २०१९ रोजी औंध येथील पंडित
भिमसेन जोशी नाट्यगृहात स्मार्ट सिटी अधिकारी, पुणे मनपा,
लोकप्रतिनीधी व स्थानिक रहिवासी यांची बैठक झाली होती. यात अधिकारी
यांनी सर्व जनतेला वचन दिले होते.
अनेक वेळेस टेकडी
फोडणारे यांच्या विरोधात नागरिक, वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी आणि
कृती समीती विरोध करत असतांनाही महानगरपालिका बिल्डर करिता आणि रस्ते करिता आपले
पर्यावरण प्रेम दूर करत आहे हे करणे योग्य नाही. टेकडीफोड प्रकरण हे मनपाचे
खाबूगिरी प्रकार आहे. पैसे द्या आणि वाटेल ते करा. यावर योग्य तोडगा निघणे गरजेचे
आहे.
टेकडीफोड करणार नाही, परंतु याचे भान
मनपाच्या अधिकारी यांना राहले नाही. यात पुणे विभागात पाषाण, बाणेर याच ठिकाणी टेकड्या राहलेल्या आहे. याचाही लचका तोडण्याचा प्रकार
सुरू आहे. यावर प्रशासनाकडून रस्ते आणि बिल्डर लोकांना तोडण्याची परवानगी देण्यात
येते. टेकड्यांचा लचका तोडण्याचा प्रकार सुरू आहे. या विभागातील टेकड्यांची
जिल्हाधिकारी मार्फत या विभागातील नागरिकांच्या उपस्थितीत मोजणी करून मार्किंग करणे
गरजेचे आहे.
येथील बिल्डर आणि
नागरिक या टेकड्या जवळ राडारोडा टाकण्याचा प्रकार करतात यामुळे या परिसरात
धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. टेकडीफोड प्रकरणा बाबत कृती समीती, वृक्ष प्रेमी,आणि या विभागातील नागरिक प्रशासनाच्या विरोधात टेकडीफोड प्रकार थांबला
नाही तर रस्त्यावर उतरतील. याकरिता स्मार्ट सिटी मुख्याधिकारी, आयुक्त मनपा पूणे, आणि मुख्यमंत्री यांना सहा हजार
नागरिकांच्या सहाय्याने निवेदन दिले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84