Type Here to Get Search Results !

"साहेब तुम्ही बसा मी मागे आहे"; वसंत मोरे यांच्या खांद्यावर हात टाकून राज ठाकरेंनी दिल्या पोज

 



पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील धायरी भागात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं असताना मनसे नेते वसंत मोरे देखील उपस्थित होते. यावेळी एका प्रसंगी राज ठाकरेंनी काहीशी भीती व्यक्त केली. पण वसंत मोरे यांनी "मी आहे ना" असा शब्दांत त्यांना विश्वास दिला. 

 

या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे आणि वसंत मोरे या कार्यक्रमात एकत्र दिसले. इतकंच काय तर कार्यालयाचं उद्घाटन करताच राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या खांद्यावर हात ठेवला. या कृत्यामुळे अक्षरशः कॅमेरॅचे फ्लॅश पडू लागले. आजच्या कार्यक्रमात हे दोघे बऱ्याच वेळ एकत्र चर्चा करताना दिसले यामुळं वसंत मोरे यांच्यावर राज ठाकरे नाराज नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

या कार्यक्रमावेळी राज ठाकरे यांचं स्वागत भगवी शाल देऊन करण्यात आलं. यावेळी "तुम्ही मला साधू करणार वाटतं," अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. सध्या राज ठाकरे जिथं जातायेत तिथं त्यांचं भगवी शाल देऊन सत्कार केला जात आहे. यावरुनच राज ठाकरेंनी हे मिश्किल विधान केलं.

 

धायरीतील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडल्यानंतर खुर्चीवर बसताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारलं, "खुर्ची व्यवस्थित आहे ना? मागे कुणाचीतरी खुर्ची तुटली होती." यावर वसंत मोरे यांनी "चंद्रकांत पाटील यांची खुर्ची तुटली होती." असं उत्तर दिलं. पण त्याचवेळी "साहेब तुम्ही बसा मी मागे आहे." अशा शब्दांत त्यांना बिनधास्तपणे खुर्चीत बसण्याचा विश्वासही त्यांनी ठाकरेंना दिला.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.