Type Here to Get Search Results !

आपला पिट्याभाई अर्थात रमेश परदेशीचा सिनेमा येतोय ‘सरला एक कोटी’ पत्त्यांचा किंग...

 


पुणे, दि.१४ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): नवा खेळ ठरलाय, कोण कोण खेळणार..?? पहिला खेळाडू भोजनेंचा ओंकार, पटावर तुमच्यासाठी मांडलाय जुगार ! खेळ आमचा, फुल्ल टाईमपास तुमचा ! असे म्हणत आपला पिट्याभाई अर्थात रमेश परदेशीने फेसबुकवर नुकतीच एक पोस्ट शेअर करत, त्याच्या जानेवारी २०२३ मध्ये येऊ घातलेल्या ‘’सरला एक कोटीया नव्या चित्रपटाचे आमंत्रण सगळ्यांना दिले आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना पिट्याभाईने तुम्हाला पट रंगवायला निमंत्रित केले आहे.

 

आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन रोलआपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकताय, बघताय ते अगदी खरंय... ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. ओंकारची मुख्य भूमिका असलेला ‘’सरला एक कोटीया चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ओंकार एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय... कायम विनोदी भूमिकेत त्याला बघितल्यामुळे, आता या नवीन लूकची चर्चा होत आहे. हा चित्रपट नक्की काय आहे आणि ओंकारची त्यात काय भूमिका असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

 

सरला एक कोटीया नावातच या चित्रपटाचं वेगळेपण आहे... ओंकारच्या या पोस्टरमध्ये तो पैसे लाऊन पत्ते खेळताना दिसतोय, समोर सिगरेटची थोटकं आणी दारूची बाटली आहे... पत्ते खेळण्यात तरबेज असलेला ओंकार एक बिधनास्त लूक देताना दिसतोय. याशिवाय पोस्टरवर जो नशिबालाही डावाववर लावतो तोच खरा गॅम्बलरअसं लिहिलेलं आहे. त्यामुळे पत्ते, दारूचा गुत्ता, सिगरेट, बिनधास्त हावभाव अशा सगळ्या गोष्टी आणि चित्रपटाचं नाव सरला एक कोटीअसल्याने चित्रपटाचा नक्की विषय काय, त्याची कथा काय आणि हे सगळं कधी उलगडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यातही ओंकारचं हे पोस्टर बघून अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे की चित्रपटाच्या नावात असलेली सरलाकुठंय?

 

सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट आटपाडी नाईट्सचे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे असून, कार्यकारी निर्माते विनोद नाईक हे आहेत. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.