Type Here to Get Search Results !

पहा 'टाकाऊ पासून टिकाऊ'चा पर्याय वापरुन सजवलेले सावित्रीबाई फुले उद्यान

 

पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): महापालिकेच्या पिंपळे निलख येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात 'टाकाऊ पासून टिकाऊ'चा पर्याय वापरला गेला आहे. याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 22 डिसेंबर 2022) करण्यात आले.

 

उद्यानात टाकाऊ फायबर रेनफोर्स्ड प्लास्टिक (एफआरपी) पासून 'सेव ट्री, सेव लाईफ' स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये एफआरपीपासून तयार करण्यात आलेल्या दोन्ही मानवी तळहातावर शोभेच्या रोपांची लागवड केली आहे.

 

उद्यानात स्वागत कमानीच्या दोन्ही उभ्या खांबांवर वर्टीकल गार्डन तयार करण्यात आले असून, त्यामध्ये 'वेस्ट टू वंडर' हे नाव इंग्रजी अक्षरात लिहिले आहे. टाकाऊ जुन्या विद्युत खांबांपासून शोभेच्या 'तोफ' तयार करण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या जीन्स पॅन्टपासून योगासनाचे विविध प्रकार दर्शवणारा अर्धआकृती मानव साकारण्यात आले आहेत. जुन्या टायरचा वापर करून हुबेहूब घड्याळाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

 

जुने टायर, विद्युत खांब व बांबू वापरून 'रणगाडा' उभा केला आहे. टायरपासून बनविलेल्या बुलेट दुचाकीची प्रतिकृती तयार केली आहे. या कलाकृतीसोबत सेल्फी काढून घेण्यास नागरिक गर्दी करीत आहेत. तसेच जुने विद्युत खांब, प्लास्टिक व बहुरंगी फुलांचा वापर करून उड्डाण भरणारे फुलपाखरू निर्माण करण्यात आले आहे. जुन्या लाकडांचा वापर करुन आकर्षक बैलगाडी तर लाकडाच्या ओंडक्यापासून प्रतीकात्मक रेल्वे तयार करण्यात आली आहे. लाकडांचा वापर करून मानवी चेहर्‍यावरील विविध भाव दर्शवणार्‍या विदूषकाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत

 

या वेळी सहशहर अभियंता मनोज सेठिया, उपायुक्त सुभाष इंगळे, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी, दत्तात्रय आढळे, सहायक उद्यान अधीक्षक राजेश वसावे आदी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले की,”टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून सावित्रीबाई फुले उद्यानात साकारण्यात आलेले वेस्ट टू वंडर मॉडेल हे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक ठरणार आहे. प्लास्टिक किंवा अविघटनशील पदार्थ अथवा वस्तूंचा पुनर्वापर केल्यास पर्यावरणाचा समतोलदेखील राखला जाईल.”

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.