Type Here to Get Search Results !

पुण्यातील प्रस्तावित दुसऱ्या महानगरपालिका अंमबजावणी विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी

 



पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):  राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी दि. 13 जानेवारी २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबत स्पष्ट केले आहे.

 

या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकार 'स्थिर' असल्याचा दावा केला जात असला तरी शिंदे सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होणार का? जानेवारीमध्येही सत्ता संघर्षावरील सुनावणीतील निर्णय शिंदे सरकार विरोधात गेल्यावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे काय? अशी शंका उपस्थित होत असताना फुरसुंगी आणि उरूळीदेवाची गावांसाठी नवी नगरपालिका निर्माण करण्याच्या शिंदे सरकारच्या आदेशाची अमंलबजाणीही कदाचित लांबू शकते, असे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले.

 

पुणे महापालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळी फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता. परंतु, या गावांना सुविधा न देताच वाढीव मिळकतकरामुळे पालिकेत समावेश तसेच वाढीव मिळकतकर भरण्यासही नागरिकांकडून विरोध होत होता.

 

या पार्श्‍वभूमीवर अनेक आंदोलने तसेच मोर्चेही झाले. यामुद्यावर पुढाकार घेत माजी आमदार विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर वर्षाबंगल्यावर या गावांतील पदाधिकाऱ्यांशी विशेष बैठक आयोजीत केली होती. यामध्ये या गावांसह पुणे पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अन्य गावांतील मालमत्ता कर व मूलभूत सोयी सुविधांबाबतही मुख्यमंत्री शिंदे चर्चा करून निर्णय घेणार होते.

 

तसेच फुरसुंगी आणि उरूळीदेवाची या सोबतच वाघोली, हडपसर यासह अन्य गावांतूनही आता स्वतंत्र महापालिकेची मागणी होत आहे. याबाबत न्यायालयात जाण्याची तयारीही काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे फुरसुंगी, उरूळीदेवाची नवी नगरपालिका करण्याच्या आदेशाच्या अमंलबजावणीत अडथळे येऊ शकतात.

 

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष बैठकीला माजी आमदार विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव भूषण गगराण, पालिकेचे आयुक्‍त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह फुरसुंगी आणि उरूळीदेवाची या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

पुणे महापालिकेतून फुरसुंगी आणि उरूळीदेवाची गावे बाजूला काढून नवी पालिका तयार करण्याबाबतच्या निर्णयावर दोन गट निर्माण झाले आहेत. त्यातच शिंदे गटात गेलेले माजी आमदार विजय शिवतारे यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठीच ही खेळीकेल्याची चर्चा आहे, याची अमंलबजावणी झाली नाही किंवा लांबली तर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावरच पडणार आहे.

 

यावेळी उपस्थितांनी फुरसुंगी आणि उरूळीदेवाच्या वाढीव कराबाबत मागणी केली होती ती कमी होण्याबाबत निर्णय अपेक्षित असताना या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकाच करावी, असा तातडीचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेत तशी घोषणाही केली. परंतु, राज्य सरकारच्या सत्ता संघर्षावर (ठाकरे गट विरोधात) न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नसल्याने शिंदे सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाला किती महत्त्व आहे? याबाबत आता चर्चा सुरू आहे. कारण, शिंदे गटाविरोधात न्यायालयीन निर्णय गेला तर हे सरकार कोसळू शकते. यामुळे शिंदे सरकारकडून घेण्यात आलेले निर्णयाची अमंबजावणी होणार का? याबाबत राजकीय वर्तुळातूनही शंका व्यक्‍त केली जात आहे.

 

पुणे महापालिकेवर भाजप पक्षाला सत्ता हवी आहे, यासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक निर्णयात सावध भूमिका घेतली जात आहे. फुरसुंगी आणि ऊरूळीदेवाची नवी नगरपालिकेच्या निर्णयाबाबतही भाजपकडून कोणतीही ठोस पक्षीय भूमिका अद्यापही कोणी घेतलेली नाही. विशेष म्हणजे हा निर्णय झाला, त्या बैठकीला भाजपचा कोणताही पदाधिकारी उपस्थित नव्हता.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.