पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या येमेन देशाच्या सहा नागरिकांवर डिपोर्टेशनची कारवाई करण्यात आलेली आहे. यात दोन पुरुष अल्खराज अतेक (३७), श्र्वाकी खररज (३४) यासह महिला हेबा हुसेन व तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. सदरील सहा जण पुण्यातील कोंढवा परिसरात वास्तव्यास होते.
सदर नागरिकांना एफ. आर. ओ. कार्यालयाने ताब्यात घेतल्यानंतर दोन पुरुषांना कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत देखरेखीखाली ठेवण्यात आले. तर महिलेला तिच्या तीन अल्पवयीन मुलांसोबत पुणे हडपसर रेस्क्यू फाऊंडेशन, येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या सर्व जणांचे नवीन पासपोर्ट मुंबईस्थित येमेनदेशाचे दुतावासाकडून प्राप्त करुन घेण्यात आले.
येमेन परकीय नागरिकांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्यात येणार होते. परंतू सदरील नागरिकांचा डिपोर्टेशन व येमेन येथे जाण्यास या दोन्ही बाबतीत विरोध होता. मुंबईस्थीत येमेन दुतावासाचे मदतीने त्यांचे विमान तिकीट आरक्षित करण्यात आले. मोठ्या शिफातीने येमेनी नागरिकांना अखेर मुंबई विमानतळ येथे नेवून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84