Type Here to Get Search Results !

झोपडपट्टीवासियांचा आक्रोश मोर्चा

 


पुणे, दि. 19 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): दि.१९/१२/२०२२ राज्यातील सरकारी, गायरान, शासकीय, निमशासकीय, वने, रेल्वेलगत नदी, नाले, पाटबंधारे, डोंगरालगत असलेल्या झोपडपट्टी अतिक्रमणे नियामानुकूल करून झोपडीधारकांच्या मालकीचा ७/१२ उतारे द्या. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने झोपडपट्टीवासीयांचा जन आक्रोश मोर्चाकाढण्यात आला होता.

 

याप्रसंगी वैराट म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी गायरानातील अतिक्रमणे हटविण्याच्या आदेशाला तुर्त स्थगिती दिली असली, तरी महाराष्ट्र शासनाने केवळ सरकारी गायरान अतिक्रमण ३१ डिसेंबर २०२२ पुर्वी नियमानुकूल करण्याचे निर्देश दिले असले तरी अद्याप जिल्हा प्रशासनाची नियमानुकूल कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गायरान, शासकीय, निमशासकीय, वने, रेल्वेलगत, नदी, नाले, पाटबंधारे, डोंगरालगत असलेल्या झोपडपट्टी अन्य जागेवर वसलेल्या अतिक्रमण नियमानुकूल सरसकट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली..

 

याप्रसंगी या मोर्चात ज्येष्ठ साहित्यीक आचार्य रतनलाल सोनग्रा असे म्हणाले की, गरीब जनतेच्या जीवनामध्ये त्याच झोपडं महत्वाच असतं, त्याचा निवारा हिसाकवणे हे अमानुष कृत्य आहे. शासनाने रयतेचा निवारा द्यावा आणि गोरगरीबांचा आशिर्वाद घ्यावा. रयतेला दडपून जे शासन गैरकृत्य करते ते नष्ट होऊन जाते. म्हणून हा आक्रोश मोर्चा सरकारला ईशारा आहे..

 

कामगार नेते प्रविण बाराथे, ज्येष्ठ कायदे सल्लागार अॅङ राहील मलिक आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी महम्मद शेख, दत्ता डाडर, शिवाजी भिसे, राजाभाऊ शिंदे, हरिभाऊ वाघमारे, सुनिल भिसे, प्रा. सुरेश धिवार, सुरेखा भालेराव, वैशाली अवघडे, वंदना पवार, प्रमिला ठोंबरे, नितिन वन्ने, दत्ता कांबळे, प्रदिप पवार, संतोष सोनावणे, आबा शिंदे, आबा चव्हाण, बापू शेंडगे, तानाजी पाथरकर आदींची भाषणे झाली.

 

 प्रास्ताविक राज्य सरचिटणीस काशिनाथ गायकवाड यांनी केले. आभार गणेश लांडगे यांनी मानले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.