Type Here to Get Search Results !

'डीपी'अभावी समाविष्ट गावांमधील टीडीआर अंमलबजावणीत अडचण?

 

पुणे, दि. 23 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्य शासनाच्या आदेशानुसार 2017 मध्ये महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) वापरण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे.

उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव (उर्वरित), शिवणे (उत्तमनगर), केशवनगर, साडेसतरानळी, शिवणे, आंबेगाव (खुर्द), आंबेगाव (बुद्रुक), उंड्री आणि धायरी ही या ११ गावांची नवे आहेत.

गावांना मिळालेल्या या मुभेमुळे या गावांमधील नागरी सेवा-सुविधांसाठीची आरक्षणे तसेच नागरी सेवा क्षेत्र महापालिकेस टीडीआरच्या मोबदल्यात ताब्यात घेणे शक्‍य होणार आहे. परिणामी या गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या मुलभूत सुविधाही पुरविता येणार असून, गावांमधील बांधकामांना चालना मिळणार आहे.

ही गावे पालिकेत आल्यानंतर तसेच शासनाने संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक बांधकाम विकास नियंत्रण नियामवली जाहीर केल्यानंतरही याबाबत निर्णय घेतलेला नसल्याने बांधकाम व्यावसायिक तसेच महापालिकेकडून राज्य शासनाकडे याबाबत विचारणा केली जात होती. त्यावर अखेर शासनाने निर्णय घेत याबाबतचे आदेश दिले आहेत.

शासनाने जवळपास पाच वर्षांनंतर हा निर्णय घेतला असला तरी या गावांचा विकास आराखडा (डीपी) अद्याप झालेला नाही. मात्र या निर्णयामुळे शहराच्या मुळ हद्दीतील तसेच नवीन 11 गावांमधील टीडीआर या दोन्ही हद्दीत वापरणे शक्‍य होणार असल्याने या गावांमधील बांधकामांना गती मिळणार आहे.

मागील पाच वर्षांपासून महापालिका या जागा ताब्यात मिळाव्यात, यासाठी शासन तसेच पीएमआरडीएकडे पाठपुरावा करत असून, अखेर शासनाच्या या सुधारीत आदेशाने या जागा महापालिकेस मिळणार आहेत.

टीडीआर वापरासाठी महापालिकेच्या मूळ हद्दीची मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2017 लागू राहणार असून, 11 गावांमधील टीडीआरचे विकास हस्तांतरण प्रमाणपत्र (डीआरसी) देण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. याडीआरसीचा ताळमेळ पालिका आयुक्तांनी ठेवावा. तसेच ही गावे महापालिकेत येण्यापूर्वी ती पीएमआरडीएच्या ताब्यात असल्याने या गावांमधीलडीआरसीमहापालिकेस देण्यासह या गावांमधून पीएमआरडीएने ताब्यात घेतलेल्या सुविधा क्षेत्रांच्या जागा महापालिकेस मिळणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.