Type Here to Get Search Results !

आम्ही दोघे उत्तमनगरचे भाई, आमच्या नादाला लागू नका; दोन भाईंची उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत दहशत

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): दारू पिण्यासाठी मजुराकडे ५०० रुपयांची मागणी केली असताना, त्याने ती पूर्ण न केल्याने चिडून जाऊन दोघांनी मिळून त्या मजुराला बेदम मारहाण करण्याबरोबरच कोयत्याने वार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी जखमी मजुराच्या मदतीला धावलेल्या नागरिकांवर देखील कोयता उगारून, “आम्ही दोघे उत्तमनगरचे भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका.असे म्हणत दहशत निर्माण केल्याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आले आहे.

 

ज्यावेळी दोघे हल्लेखोर नागरिकांवर धावून गेले, त्यावेळी मदतीला धावलेल्यांनी मागे पळ काढला. सोमवार दि. २६ डिसेंबर २०२२ सकाळी साडेआठच्या सुमारास न्यु कोपरे बस स्टॉप शेजारील, बालाजी सुपर मार्केटच्या समोर सदरील घटना घडली. या घटनेत जखमी झालेला मजूर नामे रघुनाथ पवार (वय. ५५ वर्ष, रा.कोंढवे धावडे, एनडीए रोड, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. रघुनाथ पवार हे सोमवारी सकाळी मजुरीच्या शोधात घटनास्थळी येऊन थांबले होते. यावेळी तोंड ओळखीच्या असलेल्या या दोन्ही हल्लेखोरांनी दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. ती पूर्ण न केल्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. मात्र पवार यांनी तो उजव्या हातावर झेलल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला.

 

यावेळी नागरिक भांडण सोडवण्यासाठी धावले असता, दोघांनीही नागरिकांच्या अंगावर कोयता रोखून धरत, “आम्ही दोघे उत्तमनगरचे भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका.असा इशारा दिला. यावेळी भयभीत झालेल्या नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोघांनीही केलेल्या या कोयता हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

 

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या उत्तमनगर पोलिसांनी संतोष मोहन सावंत (वय.३५ वर्ष, रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर, पुणे) आणि हेमंत राम भट (वय. २७ वर्ष, रा.शिवणे, पुणे) यांना अटक केली असून, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे पुढील तपास करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.