Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावरील डीपी रस्त्यांचा प्रश्न लागणार मार्गी; आम आदमी पार्टीने दिला होता उपोषणाचा इशारा

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): धायरी-सिंहगड रस्ता परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेले डीपी रस्ते मार्गी लावण्यासाठी आम आदमी पक्षाने उपोषणाचा दणका देताच प्रशासनाला खडबडून जाग आली.

 

धायरी येथील डीपी रस्ते अद्यापही कागदावरच आहेत. पुरेशा रस्त्याअभावी वाहतूक कोंडी होत आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन करण्यात आले होते.

 

तर धायरी गावातील डीपी रोड कृती समितीचे अध्यक्ष धनंजय बेनकर,”डीपी रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. रस्त्यासाठी जमीन संपादन करण्यात येणार्‍या शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार योग्य मोबदला व कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत नोकरी देण्यात यावी. प्रत्यक्षात रस्ते होईपर्यंत लढा सुरू राहणार आहे.” असे म्हणाले.

 

पक्षाचे राज्य संघटक व शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे, आबासाहेब कांबळे, प्रभाकर कोंढाळकर, सुनीता काळे, बेनकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

त्यानंतर महापालिकेने धायरी येथील प्रस्तावित 60 फुटी डीपी रस्त्याच्या मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व माजी उपसरपंच धनंजय बेनकर यांनी गेल्या महिन्यात या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांसह उपोषण आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. धायरी येथील बेनकरवस्तीतील सर्व्हे क्रमांक 6, 7, 8 मधून डीपी रस्ता प्रस्तावित आहे.

 

सिंहगड रस्ता बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. एस. पाटील म्हणाले की, “या रस्त्याच्या जागेची मोजणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल संबंधित विभागाला सादर करण्यात येणार आहे.”

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.