Type Here to Get Search Results !

बैलगाडा शर्यतीचा मुळशी पॅटर्न; राज्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीची तयारी सुरु

 

पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस व माजी सभापती स्व. तुकारामबुवा हगवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भुकूम (ता. मुळशी) येथे राज्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार असून त्यासाठी पंचवीस एकरमध्ये मैदान तयार केले आहे. भूकुम येथील तलावाच्या मागील बाजूस आंग्रेवाडी येथे ही शर्यत रंगणार असून, एका वेळी तीस गाडे पळतील, अशी व्यवस्था केली आहे.

 

राज्यातील सर्व स्पर्धकांना सहभागी होण्यासाठी कळविले गेले आहे, असे संयोजक व जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य राजेंद्र हगवणे यांनी सांगितले. राज्यातील कोल्हापूर, जालना, नगर, सातारा, कराड, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील गाडा मालकांना सहभागासाठी कळविले आहे.

 

या स्पर्धेमध्ये एक हजार स्पर्धक येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गर्दी होऊ नये, यासाठी संपूर्ण लोखंडी रोलिंग केले आहे. तसेच, पार्किंगची मोठी सोय केली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.