पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सूस खिंड परिसरात निर्जन स्थळी एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालुन खुन करणा-या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन युनिट चारच्या गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस आणला.
गुरुवारी (ता. २९ डिसेंबर 2022) पहाटे चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी तपास पथक तयार करून मार्गदर्शन व सुचना देऊन तपास पथक रवाना केले.
मयताच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता. तसेच त्याची ओळख पटविण्यासाठी कोणतेही कागदपत्र अथवा इतर ठोस माहिती उपलब्ध नव्हती. तरीदेखील युनिट- ४ चे अधिकारी व हवलदार यांनी बाणेर परिसरात मयताची माहिती घेण्यासाठी परिसर पिंजून काढला. पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व पोलीस हवलदार अजय गायकवाड हे मयताची माहिती घेत असताना त्यांना एका इसमाकडून मयताचे नाव संदीप शंकर शिंपी असल्याचे समजले. त्यानंतर तपास पथकातील इतर अधिकारी व हवलदार यांनी गोपनीय व सखोल चौकशीअंती बुधवारी (ता. २८ डिसेंबर 2022) संदिपला दोन इसमांनी बुलेटवर बसवून नेताना पाहिल्याची माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे महाळुंगे (पाडाळे) येथून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
संशयितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता सतिश रामभाऊ गिऱ्हे (रा. सचिन पाडाळे चाळ, शितलादेवी मंदिराजवळ, महाळुंगे) व दिपक विठ्ठल कोळेकर (रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर.) या दोघांनी मिळून संदिपचा डोक्यात दगड घालून खुन केल्याची कबुली दिली. संदिप हा त्याच्या पत्नीला दारु पिऊन सतत मारहाण, शिवीगाळ करीत असे. तसेच त्याच्या बायकोचा भाऊ (मेहुणा) सतिश गिऱ्हे यास व त्याच्या घरच्यांना दारुच्या नशेत शिवीगाळ दमदाटी करीत असे. या कारणामुळे वैतागुन त्यास निर्जनस्थळी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केल्याची कबुली संशयितांनी दिली. दिपक कोळेकर हा सतिश गिऱ्हे याचा साडू असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस हवलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, सारस साळवी यांनी हा तपास केला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84