Type Here to Get Search Results !

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित बीडचा फेवरेट कवी स्पर्धेत रीता राजपूत , भाग्यश्री दायमा यांना पुरस्कार जाहीर

 

पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असणारे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी कडे नवोदित लेखकांचा ओढा वाढत आहे. ही संस्था नेहमीच नवोदित लेखकांकरीता वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करत असते.

 

याच गोष्टींची दखल घेत नवोदित लेखक वर्ग भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी ला पसंती दर्शवत आहे. हीच बाब लक्षात घेता संस्थेच्या वतीने तळागाळातील नवोदित लेखकांना या प्रवाहात सामील करून घेण्याकरीता संस्थेच्या माध्यमातून ‘बीडचा फेवरेट कवी’ ही स्पर्धा राबविण्यात आली. भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचा फेवरेट कवी या स्पर्धेत विजेता होण्याचा मान रीता राजपूत, तर उपविजेता भाग्यश्री दायमा यांना मिळाला.

 

रीता राजपूत, भाग्यश्री दायमा गेली अनेक वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत, त्या तर  याचबरोबर सुनंदा निकम, सीमा मंगरूळ आदी कवी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

 

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून अनेक नवोदित साहित्यिकांना, कलाकारांना त्यांची कला जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे असे संस्थेचे उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष विशाल सिरसट राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिल्पा मुसळे, सिध्दार्थ आंबेकर, सचिव सुमंत पाटील, महिलाध्यक्ष चैताली कापसे, कोषाध्यक्ष छाया देसले यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.