Type Here to Get Search Results !

कॉंग्रेस भवन समोर आढळलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटली; रिक्षाचालक निघाला जबाबदार

 



पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): काँग्रेस भवनसमोर बेवारस आढळलेल्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. शिवाजीनगर पोलिसांनी तत्परतेने या प्रकरणाचा छडा लावल्याने हा अपघात असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

काँग्रेस भवनसमोर पुरुषाचा मृतदेह बेवारस अवस्थेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना १६ डिसेंबर रोजी मिळाली. मृतदेहाच्या डोक्यावर उपचार केलेली पट्टी होती. मृतदेहाची ओळख पटवून नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पथके नेमली. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटली. सुनील चव्हाण (वय ५४, रा. गणेश पेठ) नामक व्यक्तीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.

चव्हाण यांच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना या प्रकाराची कल्पना देण्यात आली.सुनील मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे मित्रांनी घातपात केला असावा,’ असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. पोलिसांनी चव्हाण यांच्या मित्रांकडे चौकशी केली असता, आम्ही बाहेरगावाहून आल्यानंतर शिवाजीनगर रेल्वे स्थानकात चव्हाण बेपत्ता झाल्याचे त्यांनी सांगितले.

याआधारे तपास पथकातील रणजित फडतरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील; तसेच इतर भागांतील सुमारे तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. चव्हाण यांना काँग्रेस भवनसमोरील वृद्धेश्वर हॉटेलच्या बाहेर रिक्षाने धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे एका कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात आढळले. रिक्षा क्रमांकाच्या आधारे रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. ही रिक्षा खडकी रेल्वे स्थानकाजवळ थांबली असल्याची माहिती हवलदार रूपेश वाघमारे यांना मिळाली.

वाघमारे आणि फडतरे यांनी तेथून रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने अपघाताची कबुली दिली. याप्रकरणी रिक्षाचालक अक्षय प्रशांत चव्हाण (वय २५, रा. दापोडी) याला अटक करण्यात आली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.