पुणे, दि.२३ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी गणपती माथ्यावर रात्री १ वाजेपर्यंत सुरु असलेल्या रॉयल पान शॉप समोर पोलिसांच्याच गाडीवर झालेली दगडफेक, त्यानंतर रामनगर भागात सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या फायरिंगच्या घटना ताज्या असतानाच, काल गुरुवार दि.२२ डिसेंबर २०२२ रोजी भल्या पहाटे दुचाकीवरून आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने दहा ते बारा मोटारी आणि बसेसच्या काचा फोडण्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आलेले असून, त्यातील दोघे अल्पवयीन आहेत.
करण पिंजारी (वय १८ रा.कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, उत्तमनगर आणि कर्वेनगर मधील दोघा बालगुन्हेगारांना ताब्यात घेतले असल्याचे वारजे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून मोटारी फोडताना वापरलेला कोयता जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे. सकाळी मॉर्निंग वॉल्कला आलेल्या नागरिकांसमोर ही कोयत्याने गाड्या फोडण्याची घटना घडल्यामुळे त्यांच्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत गाड्या फोडण्यात आलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या रंगाच्या स्कूटर वरून सकाळी ५ वाजून २७ मिनिटांच्या जवळपास आलेल्या तिघांनी या गाड्या फोडल्याचे दिसते आहे. यातील दुधाने लॉन्स रस्त्यावर दोन खाजगी प्रवासी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. तर वारजे नाक्यावरील शानू पटेल शाळेच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या अल्टो, स्विफ्ट, वॅगन आर, टाटा हेक्सा, स्कूल व्हॅन, साई मंदिराशेजारील ब्रिझा, नादब्रह्म सोसायटीतील उद्यानाशेजारी निसान मायक्रा अशा जवळपास २ किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बस आणि मोटारींच्या काचा फोडण्याचा प्रकार या टोळक्याने केल्याचे दिसते.
भल्या पहाटे थंडीच्या वातावरणात तसे कमी नागरिक मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलेले होते. त्यातील काहींनी सदर घटना पाहिल्यानंतर रस्ता बदलून घरी जाणे पसंत केले. यात एका सुरक्षा रक्षकाने देखील हल्लेखोरांना जवळून पाहिले. मात्र हल्लेखोरांच्या हातातील कोयता पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकाने शांत बसणेच उचित समजले. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून वारजे पोलिसांना तिन्ही हल्लेखोरांची नावे निष्पन्न करत, तिघांनाही ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी 'चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84