Type Here to Get Search Results !

कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; सांस्कृतिक पुण्यातील घटनेने खळबळ

 

पुणे, दि. 23 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याची अशीच एक घटना समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. त्यानंतर तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याची पीडित महिलेशी एका मित्राकडून ओळख झाली. फिर्यादी महिलेचा केटरिंग व्यवसाय होता. त्यामुळे आरोपी आणि फिर्यादी महिलेने एकत्र हॉटेलमध्ये सुरू करण्याचे ठरवले.

 

दरम्यान, हॉटेल सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडित महिलेला खराडी भागातील घरी बोलावले. घरी आल्यानंतर आरोपीने पीडितेला कॉफीमध्ये गुंगीचे औषध दिले. काही वेळानंतर महिला बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने महिलेवर बलात्कार केला.

 

हा सर्व प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात येताच तिने थेट पोलीस ठाणे गाठत ठाकूर विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अजयसिंग विजयसिंग ठाकूर (३१) याला  अटक केली आहे.


या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.